कारंजात सशस्त्र प्राणघातक हल्ला
By admin | Published: August 13, 2015 01:15 AM2015-08-13T01:15:34+5:302015-08-13T01:15:34+5:30
लॉटचा ताबा मिळविण्याच्या कारणावरून संगणमताने एका जणावर सशस्त्र प्राणघातक हल्ला.
कारंजा लाड (जि. वाशिम): प्लॉटचा ताबा मिळविण्याच्या कारणावरून संगणमताने एका जणावर सशस्त्र प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी ११ ऑगस्ट रात्री ९ वाजता स्थानिक दत्त कॉलनी येथे घडली. या प्रकरणी पोलीसांनी दोघांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक दत्त कॉलनीतील ओंकार सधूजी गावले (वय ६0) यांनी फियार्दीत नमुद केले की, प्लॉटचा ताबा मिळविण्याच्या कारणावरून विजय खुशालराव सावळकर (वय ४५) व भास्कर खुशालराव सावळकर (वय ४२) रा.दत्त कॉलनी यांनी संगनमत करून फियार्दीवर सशस्त्र प्राणघातक हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले. तसेच या घटनेत एका मुलीचा विनयभंगही करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीविरूद्ध कलम ३0७, ३५४ (१), १२0 (ब) ,३२३ भांदविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार कारंजा पोलीस करीत आहेत.