ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना दरमहा पंधराशे रुपये कायम प्रवासभत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 07:47 PM2021-05-19T19:47:58+5:302021-05-19T19:48:21+5:30
Akola News : यापूर्वी ११०० रुपये होता. ४०० रू याची वाढ होऊन १५०० रुपये करून निर्णय घेण्यात आला आहे.
अकोला : राज्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी यांना पंधराशे रुपये दरमहा प्रवास भत्ता मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना यापूर्वी ११०० रुपये होता. ४०० रू याची वाढ होऊन १५०० रुपये करून निर्णय घेण्यात आला आहे.
प्रवासभत्ता वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने लावून धरली होती. अखेर युनियनच्या प्रयत्नांना यश आले आहे.
कॅबिनेटमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने एकनाथराव ढाकणे, प्रशांत जामोदे, संजीव निकम आणि सर्व राज्य ग्रामसेवक युनियन टीम महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नेत्यांकडून महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.