पाचवी ते आठवी शाळा सुरु होणार ; पालकांमध्ये धाकधूक कायम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 11:39 AM2021-01-17T11:39:07+5:302021-01-17T11:39:33+5:30

Washim News कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल  की नाही याबाबत संभ्रम असल्याने पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते.

Fifth to eighth school will begin; fear among parents remains! | पाचवी ते आठवी शाळा सुरु होणार ; पालकांमध्ये धाकधूक कायम !

पाचवी ते आठवी शाळा सुरु होणार ; पालकांमध्ये धाकधूक कायम !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीमधील मुले लहान असल्यामुळे पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते. 
नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थी वयाने मोठे असतानाही, सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पालकांमध्ये धाकधूक कायम होती. कोरोनाचा आलेख खाली येत असल्यामुळे २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. दरम्यान, पाचवी, सहावीतील विद्यार्थ्याचे वय कमी असल्याने आणि प्राथमिक शाळांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन होईल  की नाही याबाबत संभ्रम असल्याने पालकांमध्ये धाकधूक कायम असल्याचे दिसून येते. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व अन्य सुविधा शाळा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, असा सूर जिल्ह्यातील पालकांमधून उमटत आहे.


पालकांना काय वाटते ?


आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरू व्हायला हव्या. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, कोरोनाविषयक नियमांचे पालन शाळा प्रशासनाकडून व्हायला हवे.
विनोद बसंतवाणी, पालक


पाचवी, सहावीतील मुले लहान असल्यामुळे शाळा प्रशासनाने अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.
डाॅ.सुनिता लाहोरे, पालक
शाळा सुरू करताना कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी.
प्रमोद ढाकरके, पालक


पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पालकांनीदेखील सतर्क राहावे.
- अंबादास मानकर, 
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

Web Title: Fifth to eighth school will begin; fear among parents remains!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.