दोन गटात मारहाण; ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 04:17 PM2019-04-02T16:17:57+5:302019-04-02T16:18:22+5:30
वाशिम : शहरातील पुसद नाकास्थित व्यवसायाच्या जागेवरून उफाळलेल्या वादादरम्यान एकाच समाजातील दोन गटात मारहाण झाली. ३० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शहरातील पुसद नाकास्थित व्यवसायाच्या जागेवरून उफाळलेल्या वादादरम्यान एकाच समाजातील दोन गटात मारहाण झाली. ३० मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी परस्परांविरूद्ध दाखल झालेल्या तक्रारींवरून पोलिसांनी ४० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सैय्यद गफ्फार सैय्यद लाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की माझे पुसदनाका येथे सदाबहार हॉटेल व रसवंतीचा व्यवसाय असून ३० मार्च रोजी हॉटेलमध्ये काम करणारे सैय्यद ईस्माईल सैय्यद लाल, सैय्यद जब्बार सैय्यद सत्तार हे हजर असताना शेजारी असलेल्या रंगीला हॉटेलवर काम करणारे शेख चांद शेख मन्नू, शेख मुस्तफा शेख मतीन, शेख वसीम शेख मन्नू, शेख कय्यूम शेख मन्नू, शेख जुनेद शेख ख्वाजा, शेख फयुम शेख चाँद यांच्यासह अन्य २० लोकांनी सदाबहार हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केली. तसेच शिविगाळ करून काठी, पाईपने मारहाण केली. यावरून नमूद आरोपींसह २० जणांविरूद्ध गुन्हे दाखल झाले.
दुसºया गटाकडून मोहम्मद वसीम शेख चांद यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की पुसदनाका येथे माझे वडिल शेख चांद शेख मन्नू यांची स्वत:च्या मालकीची जागा असून गत ९ महिन्यांपासून ती भाडेतत्वावर सैय्यद शोएब सैय्यद शब्बीर यांना देण्यात आली. दरम्यान, ३० मार्च रोजी सैय्यद शोएब यांनी वडिलांना फोनवर कळविले की सदर जागेवर काही लोक टीन ठोकत आहेत. त्यावरून मी स्वत: त्याठिकाणी गेलो असता, सैय्यद आफ्रोज, मोहम्मद एजाज मोहम्मद सईद व सैय्यद गफ्फार सैय्यद लाल यांनी वाद घातला. रंगीला हॉटेलमध्ये तोडफोड करून मारहाण केली. अशा तक्रारीवरून पोलिसांनी दुसºया गटातील आरोपींविरूद्धही गुन्हे दाखल केले.