दाेन गटात हाणामारी, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:54 AM2021-03-31T11:54:32+5:302021-03-31T11:57:04+5:30
Fighting between two groups: या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : तालुक्यातील कामठवाडा येथे एका कुटुंबाच्या घरच्या लोंखडी दरवाज्याला दगड का मारला यावरून दोन गटात वाद होउन हाणामारी झाल्याची घटना २९ मार्च रोजी सांयकाळी ६ वाजताच्या दरम्यान कामठावाडा येथे घडली. या घटनेत एक जखमी होउन उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलीसांनी ७ आरोपीला अटक केली
पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार अमोल जगदेव जाधव यांचे कारंजा ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली की, माझया घराच्या लोखंडी गेटला दिलीप उदयसिंग राठोड यांने दगड फेकुन मारला यावेळी माझे वडील जगदीश बस्सी जाधव (६५) हे घराबाहेर आले. यावेळी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड याला दगड का फेकुन मारला असे विचारला असता. त्यांने माझ्या वडीलासोबत वादावादी सुरू करून गैरकायदयाची मंडळी जमा करून माझया वडीलाला मारहान केली. यामध्ये वडील जखमी होउन त्यांना उपचारार्थ अकोला येथे भरती केले. त्यानंतर जगदीश बस्सी जाधव यांचा उपचारा दरम्यान ३० मार्च रोजी मृत्यृ झाला. यावेळी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड, देवराज राठोड, अजय मधुकर राठोड, शुभम शेषराव चव्हान, श्रावण मधुकर राठोड, ज्ञानेदेव हरींचद्र राठोड, सदासिव हरीचंद्र राठोड रा कामठवाडा यांच्या विरूध्द कलम ३०२, ३०७, ३२४, ३२३, २४३, १४७ नुसार गुन्हा दाखल केला .