वक्फ बोर्डाच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:34+5:302021-03-15T04:37:34+5:30
तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ...
तक्रारीत असे नमूद करण्यात आले की, उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसिम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराणमध्ये बदल करून त्यात असलेले आयत मधून एकूण २६ आयात वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. रिजवी यांनी उचलले पाऊल चुकीचे असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी करण्यात आली आहे. वसीम रिजवी यांनी याचिका दाखल केल्यानंतर कुराण व मुसलमानाचे सुरुवातीचे तीन खलिफा विरुद्ध अनेक खोटे व बिनबुडाचे आरोप लावले आहेत. त्यामध्ये कुराण ही आतंकवादाची शिक्षण देतो व इस्लामचे सुरुवातीचे तीन खलिफा यांनी शक्तीचा प्रयोग करून इस्लामचा प्रसार केला. कुराणामुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहे. अशा प्रतिक्रियेचे व्हिडिओ सर्वत्र पसरले आहे. त्यांच्या बोलणे एकूण मुस्लिम धर्मातील लोकांच्या धार्मिक भावना दुखविलेल्या आहे. त्यामुळे वसीम रिजवी विरुद्ध भादंविची कलम २९५ व आय.टी.ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावे व त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी माजी नगरसेवक फैयाज अहेमद, इरफान कुरैशी, अन्सार बागवान, शेख युसूफ, शेख यासिन, शे. हनिफ, रहीम कुरेशी यांच्यासह मुस्लिम युवकांनी केली आहे.