खाेटे दस्तावेज तयार करून फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:44 AM2021-03-09T04:44:43+5:302021-03-09T04:44:43+5:30
विनाेद चव्हाण यांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था अमरावती व एकात्मिक आदिवासी विकास ...
विनाेद चव्हाण यांनी पाेलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था अमरावती व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकाेला यांच्या वतीने काैशल्य विकास याेजनेंतर्गत २०१५-१६, २०१६-१७ मध्ये हाॅटेल मॅनेजमेंट तर २०१५-१६ मध्ये ऑटाेमाेबाइल प्रशिक्षण घेण्यात आल्याचे दाखविण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील जवळपास १८ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यांचे काेणत्याच प्रकारचे प्रशिक्षण झाले नसून खाेटे दस्तावेज तयार करून बाेगस प्रशिक्षण दाखवून शासनाचे काेट्यवधी रुपये संगनमताने हडप केले आहेत.
यामध्ये तेव्हाचे काैशल्य विकास याेजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन प्रकल्प अधिकारी अकाेला, तत्कालीन अप्पर आयुक्त अमरावती यांचे संगनमत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत आपल्याकडे वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसह अकाेला जिल्ह्यातील २० विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. तरी या प्रकरणाची चौकशी करून दाेषींवर फाैजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील ज्ञानेश्वर गजानन घाेंगडे, शुभम समाधान नांदे, रामेश्वर उत्तम गाेदमले, याेगेश विठ्ठल मैघणे, विष्णु सुधाकर गिऱ्हे, उमेश भीमराव खुळे, समाधान रामराव गायकवाड, सुदर्शन शालीकरात ससाने आदी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे तक्रारी केल्या असल्याचे विनाेद चव्हाण यांनी सांगितले.