कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!
By Admin | Published: May 17, 2017 07:32 PM2017-05-17T19:32:39+5:302017-05-17T19:32:39+5:30
वाशिम - हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे.
वाशिम - हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नये अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
शेतकऱ्यांनी कडधान्य उत्पादनाकडे वळावे यासाठी शासनाने जनजागृती केली. परिणामी, शेतकऱ्यांनी मोठ्या तूर पेरणी करून विक्रमी उत्पादन घेतले. मात्र, ऐनवेळी शासनाकडून तुर खरेदीबाबत अडेल धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी गरजवंत शेतकऱ्यांकडून मातीमोल भावाने तुर खरेदी केल्याने शेतकऱ्यांचे आर्थीक गणित विसकटत आहे. दरम्यान, वाशिम जिल्हा दौऱ्यावर असताना राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हमीभावापेक्षा कमी दराने तुर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याच्या सुचना दिल्या. या सुचना देवून महिनाभराचा कालावधी उलटूनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. व्यापाऱ्यांकडून ३५०० ते ४२०० रुपये या दरम्यान तूरीची खरेदी सुरू असल्याचे नमूद करीत कमी दराने तूर खरेदी करणाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोधर इंगोले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी केली.