शासकीय कामात अडथळा : माजी जिल्हा परिषद अध्यक्षासह सदस्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:29 AM2020-06-20T11:29:22+5:302020-06-20T11:29:39+5:30
मालेगाव पंचायत समितीत येऊन शासकीय कामात अडथळा आणला व रोख पुस्तीका फाडल्या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य यांचे सर्कल नसतानाही दिनांक १८ जून रोजी दुपारी १ ते २ वाजताच्या दरम्यान मालेगाव पंचायत समितीत येऊन शासकीय कामात अडथळा आणला व रोख पुस्तीका फाडल्या प्रकरणी त्या दोघांविरुद्ध मालेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फियार्दी सुधाकर देविदास टाले कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती मालेगाव यांनी फिर्याद दिली की आरोपी पांडुरंग ठाकरे व अरविंद पाटील हे दोघे आॅफिसमध्ये आले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला व शासकीय दस्तावेज रोख पुस्तक पाहण्याचा किंवा तपासण्याचा कुठलाही अधिकार नसताना ते पाहून त्यांनी शासकीय दस्तावेज फाडूून टाकले. वास्तविक पाहता या दोघांचे सर्कल मालेगाव तालुक्यात येत नसून अरविंद पाटील यांचे सर्कल मानोरा मध्ये येथे तर पांडुरंग ठाकरे यांचे सर्कल अनसिंग असून केवळ राजकीय कारणास्तव ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणली असल्याचे लक्षात येते यावरून मालेगाव पोलिसांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील तथा जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांच्याविरुद्ध मालेगाव पोलिसांनी कलम १८६ , ५०६ व आय पी सी सार्वजनिक संपत्ती प्रतिबंधक ३ नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अधिक तपास मालेगाव पोलिस करत आहेत.
उपमुकाअ यांच्या मान्यतेनंतरच मालेगाव पंचायत समितीमध्ये गेल्याचे सदस्याचे म्हणणे
या संदर्भात गुन्हा दाखल असलेले पांडुरंग ठाकरे यांनी १९ जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांना पाठविलेल्या अहवाल वजा पत्रात नमूद केले की, मालेगाव येथे जाण्यापूर्वी जि.प.चे उप.मु.का.अ. (सा) नितिन मोहुर्ले यांना भेटून मालेगाव पं.स. ला भेट देण्याचा उद्देश सांगितला. त्यांनी ताबडतोब अधिक्षकांना बोलावून बिडीओंना कल्पना दया की जिल्हा परिषद सदस्य तुमच्याकडे येत आहेत. त्यांना सहकार्य करा. विशेष म्हणजे गाडी पाहिजे का याची सुध्दा विचारणा केली.परंतु विकास गवळी यांनी आमच्याकडे दिलेल्या माहितीनुसार कॅशबुकमध्ये काही पाने कोरे सोडलेली होती. त्यावर आम्ही रेषा मारल्यात. यावेळी खुद्द बिडीओ हजर होते. तेव्हा ते काहीच म्हणाले नाही परंतु आमचा उददेश सरळ होता.