अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

By admin | Published: June 12, 2014 10:57 PM2014-06-12T22:57:02+5:302014-06-12T23:08:10+5:30

अ.जा.ज.प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१) (१0) (११) कलमासह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून हनीफ शहा, आशपाक शहा यांना अटक करण्यात आली.

Filed under the laws of anti-immunity | अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

Next

मानोरा : मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वसंतनगर मानोरा येथील २२ वर्ष वयाच्या हिने दिलेल्या फिर्यादीवरून शाहरूख हनीफ शहा, हनीफ खैराती शहा, आसपाक हनिफ शहा व एका महिलेविरूद्ध अ.जा.ज.प्रतिबंधक कायद्याच्या ३ (१) (१0) (११) कलमासह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून हनीफ शहा, आशपाक शहा यांना अटक करण्यात आली. ११ जूनला न्यायालयासमोर हजर केले असता २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार ९ जूनला वसंतनगर मानोरा येथे पीडित युवती स्वत:च्या घरी अभ्यास करीत असताना आरोपी शाहरूख शहा, आसपाक शहा, हनीफ शहा व एका महिलेने संगनमताने तिला तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार का दिली या कारणावरून अश्लिल भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून कपडे फाडले. तसेच बांगड्या फोडून, विनयभंग करून केला.याबाबतच्या फिर्यादीवरुन १0 जूनला आरोपीविरूद्ध कलम ३५४, २९४, ४४८ अधिक ३४ , ३५४ अ (१) (२) फौ.दु.का.३ (१) (१0) (११) अ.जा.ज.प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून हनीफ खैराती शहा (वय ५५ ), आसपाक शहा (वय २७)यांना अटक करून ११ जूनला न्यायालयात हजर केले.तेव्हा न्यायाधीशांनी दोनही आरोपींना २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. अन्य दोन आरोपी अद्याप पसार असून घटनेचा तपास कारंजा पोलीस उपविभागीय अधिकारी किरण धोटे, पोलिस निरीक्षक एस.एल. दोनकलवार, पोहेकाँ माणिक चव्हाण, सुधाकर पवार, किशोर दोनोडे, खरात आदी करीत आहे.

Web Title: Filed under the laws of anti-immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.