अनधिकृत बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Published: June 17, 2014 09:34 PM2014-06-17T21:34:51+5:302014-06-17T23:49:20+5:30
अनधिकृत बांधकाम प्रकरणी नगर परिषदेचे अधिकार्यांनी दोघांविरूघ्द गुन्हा दाखल करण्यात आला.
वाशिम : येथील शहर पोलिस स्टेशनच्या मागे असलेल्या ईश्वरी कॉलनी जवळ शहरातील बिल्डर व्यावसायीकांनी अनधिकृत बांधकाम केले. याप्रकरणी नगर परिषदेचे आरेखक तथा पदनिर्देशीत अधिकार्यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरूघ्द नगर रचना अधिनियम १९८३ च्या कलम ५४ सह (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
वाशिम शहरातील अनिल ब्रिजलाल नेनवाणी व शंकर अशोककुमार केसवाणी या दोघांनी शेत सर्वे क्रमांक ३४८ मधील भुखंड क्रमांक १७ व १८ यावर फ्लॅटचे बांधकाम केले. सदर बांधकाम करणेसाठी नगर परिषदेने १५ अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या अटी व शर्तीच्या कायद्याचा भंग केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. नेनवाणी व केसवाणी यांनी ज्या ठिकाणी बांधकाम केले त्या ठिकाणापासुन मोठा नाला जातो. या नाल्यामध्ये ढब्बरचा भराव टाकुन नाल्यावर बांधकाम केले. भुखंडावर नगर परिषदेने ७१२.६४ चौ.मी. बांधकामाची परवानगी दिली आहे. परंतू परवानगी व्यतिरिक्त अनाधिकृत बांधकाम १२७४.४0 चौ.मी. बांधकाम केल्याचे नगर परिषदेच्या अधिकार्यांना आढळून आले. बांधकाम केलेल्या जागेमध्ये यमसय अंतर मध्ये खुल्या जागेत ५६१.६0 चौ.मी. बांधकाम अनाधिकृत करण्यात आले आहे. सदर बांधकाम हे १ जुन २0१२ रोजी दिलेल्या बांधकाम परवानगी नुसार नसल्याच आढळून आले. त्यामुळे सदर जमीनीवरील विकसीत केलेले बांधकाम हे कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. उपरोक्त दोन्ही बिल्डरला ३१ मे २0१४ रोजी अधिनियमाचे कलम ५४ प्रमाणे नोटीस देऊन बांधकाम थांबविण्याची सुचना दिली होती. या सुचनेमध्ये स्पष्ट नमुद होते की, सुचना मिळाल्यापासुन एक महिण्याचे आत भुखंड क्र. १७ व १८ या जागेवरील बांधकाम पाडुन टाकावे व सदरच्या जागेचा अनाधिकृत वापर करण्याचे बंद कराव. सदर विकासाचे काम केले जाण्यापुर्वी जमीन ज्या स्थितीत होती त्या स्थितीत आणावी. या सुचनेचे पालन न केल्यास आपणाविरूध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. याशिवाय अनाधिकृत बांधकाम पाडण्यात येईल. अशी सुचना देण्यात आली होती. उपरोक्त सुचनेचे पालन न केल्यामुळे व सदरहू जागेवर विकसीत अनाधिकृत बांधकाम केल्याने नगर परिषदेचे आरेखक तथा पदनिर्देशीत अधिकारी सय्यद अख्तर अली सय्यद गफुर यांनी वाशिम शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद नोंदविली. या फिर्यादीवरून पोलिसांनी केसवाणी व नेनवाणी यांच्याविरूध्द नगर रचना अधिनियम १९८३ च्या कलम ५४ सह (२) नुसार गुन्हा दाखल केला. यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.