पदोन्नती कोट्यातील ३३ टक्के आरक्षित पदे भरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:42 AM2021-04-20T04:42:30+5:302021-04-20T04:42:30+5:30
-------------------------------- नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब ...
--------------------------------
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सोमवारी केले आहे.
-----------------------------
वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण
वाशिम : रिसोड, मालेगाव व वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले असून, काही लोकांनी जमीन वहितीखाली आणली आहे. त्याचा शोध घेऊन पावसाळ्यापूर्वीच अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांनी सोमवारी केली.
-----------------------------
एस.टी.मध्ये नियम पाळण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनापासून बचावाकरिता जिल्हा प्रशासनाने विविध स्वरूपातील नियम घालून दिले आहेत. त्याचे एस.टी.ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी पालन करावे. तोंडाला सदोदित मास्क लावून ठेवण्यासह शक्यतोवर फिजिकल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने सोमवारी केले.
--------------------------------
लसीकरणाबाबत जनजागृती
वाशिम : जिलह्यात लसीचे डोस प्राप्त झाले असून, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने लसीकरण करावे, याबाबत वाशिम पालिकेने सोमवारी लसीकरणाबाबत जनजागृती केली.