वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:46 PM2017-12-01T13:46:04+5:302017-12-01T13:50:49+5:30

वाशिम : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले असून, सदर काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

In the final phase of the production of Washim District Gazetteer |  वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात

 वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीची कार्यवाही अंतिम टप्प्यात

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक विषयावर स्वतंत्र प्रकरण तालुकानिहाय माहिती संकलन

वाशिम : वाशिम जिल्हा गॅझेटियर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या दर्शनिका विभागामार्फत हाती घेण्यात आले असून, सदर काम अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये जिल्ह्याची भौगोलिक, ऐतिहासिक, कृषि, उद्योग, बँकिंग, व्यापार, व्यवसाय, दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती यासह प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. या प्रत्येक विषयांवर स्वतंत्र प्रकरण जिल्हा गॅझेटियरमध्ये समाविष्ट असणार आहे. हे शासकीय प्रकाशन असल्याने व पुढील अनेक वर्षांसाठी हे जिल्हा गॅझेटियर उपयुक्त ठरण्याच्या दृष्टीने यामध्ये प्रत्येक बाबीची अधिक सखोल व अचूक माहिती समाविष्ट केली जाणार आहे. तसेच जिल्हा गॅझेटियरच्या अनुषंगाने संकलित करण्यात येणारी माहिती व त्याची पध्दती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व शासकीय विभागांनी व इतर अभ्यासकांनी जिल्ह्याच्या अनुषंगाने अचूक माहिती उपलब्ध करून देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. वाशिम जिल्ह्याला प्राचीन इतिहास असून याबाबतच्या सर्व नोंदी वाशिम जिल्हा गॅझेटियरमध्ये येण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय माहिती संकलित करण्याचे काम केले जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या. वाशिम येथे सापडलेली प्राचीन नाणी व इतर वस्तूंची माहिती जिल्हा गॅझेटियरमध्ये आवर्जून समाविष्ट केली जावी, असा सल्लाही द्विवेदी यांनी संबंधितांना दिला आहे.

Web Title: In the final phase of the production of Washim District Gazetteer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.