अखेर शिक्षकांना पीएफ, डीसीपीएस पावत्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:58+5:302021-06-26T04:27:58+5:30
शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, लेखाधिकारी बाबाराव काळपांडे, सहायक लेखाधिकारी बाळकृष्ण इंगोले यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शिक्षणाधिकारी मेश ...
शिक्षणाधिकारी रमेश तांगडे, लेखाधिकारी बाबाराव काळपांडे, सहायक लेखाधिकारी बाळकृष्ण इंगोले यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. शिक्षणाधिकारी मेश तांगडे, लेखाधिकारी बाबाराव काळपांडे, बाळकृष्ण इंगोले व मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. विनोद नरवाडे यांच्या हस्ते काही सेवापुस्तिका व पावत्या वाटप करण्यात आल्या. यावेळी जिल्ह्यातील बऱ्याच शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हा कार्यक्रम २३ जून रोजी दुपारी १२ वाजता लेखाधिकारी वाशिम यांच्या दालनात संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक संघाकडून सर्व अधिकारी वर्गाचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. लेखाधिकारी यांच्या वतीने पाच मुख्याध्यापक यांना सेवापुस्तक व पावत्या देऊन सन्मानित करण्यात आले. विविध विषयावर चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले.