अखेर नाफेडला मालेगाव येथे तूर खरेदीचा मुहूर्त सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 04:51 PM2020-02-24T16:51:37+5:302020-02-24T16:52:04+5:30
२४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : मालेगाव येथे नाफेडतर्फे तूरीचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. याची दखल घेत २४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
शेतकºयांचा शेतमाल घरात येताच बाजारभाव गडगडतात, याचा प्रत्यय यावर्षीही शेतकºयांना आला आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा याकरीता मालेगाव येथे नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक होते. परंतू, खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होत असल्याने शेतकºयांना प्रति क्विंटल ७०० ते ९०० रुपयापर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. याची दखल घेत २४ फेब्रुवारी रोजी मालेगाव येथे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव शिंदे, सुभाषराव देवळे, जगदीश बळी, भाऊराव खंडारे, भिकाराव घुगे, ज्ञानबा जाधव, राजेश इंगोले, प्रकाश वाझुळकर, मोहन शेळके, हरिदास राऊत, शोभाबाई वाझुळकर, ताराबाई राठोड, कैलासराव आंधळे, सचिन इंगोले गजानन काळे आदी उपस्थित होते.
ज्या तालुक्यात जमिन, त्याच तालुक्यात नोंदणी
शेतमाल विक्रीसाठी शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी बंधनकारक केली. ज्या तालुक्यात शेतजमीन आहे, त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रांवर नोंदणी करावी लागते. या नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, तूर पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ही कागदपत्रे नोंदणीवेळी सादर करणे बंधनकारक आहे. नोंदणी झालेल्या शेतकº्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात येणार आहे. एसएमएस आल्यानंतर नोंदणी केलेल्या केंद्रांवरच शेतकºयांना विक्रीसाठी तूर न्यावी लागणार आहे. पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची सातबारा आणि स्थळ पाहणी करून महसूल आणि कृषी विभाग पडताळणी करणार आहे. एसएमएस मिळाले असतील, अशा शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आणावी असे आवाहन भगवानराव शिंदे यांनी केले.