अखेर वाजली कारखेड्यात शाळेची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:28 AM2021-07-16T04:28:23+5:302021-07-16T04:28:23+5:30
कारखेडा ग्रामपंचायत व सनियंत्रण समितीच्या ठरावाप्रमाणे १५ जुलै रोजी गावातील के. एल. देशमुख विद्यालयातील ८ वी ते ...
कारखेडा ग्रामपंचायत व सनियंत्रण समितीच्या ठरावाप्रमाणे १५ जुलै रोजी गावातील के. एल. देशमुख विद्यालयातील ८ वी ते १२ वीच्या वर्गाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सरपंच सोनाली बबनराव सोळंके उपसरपंच अनिल काजळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीना ढोके, ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती. सकाळी ११.३० वाजता के. एल. देशमुख विद्यालयाच्या वतीने वर्ग ८ ते १२ सुरू करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश आडे यांनी विद्याथ्याचे सर्व नियम अटी पाळून प्रवेश देण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या आज शाळा सुरू होण्याचा विद्यार्थ्याचा आनंद गगनात मावेनासा होता.
-------------------
पहिली ते चाैथीला परवानगी नाही.
कारखेडा ग्रामपंचायतने गावातील के. एल. देशमुख विद्यालयासह गावातील जि.प. केंद्र शाळेतील पहिली ते चाैथीचे वर्ग सुरू करण्याचाही ठराव घेतला होता. त्यानुसार सकाळी १० वाजता १ ते ४ या वर्गही भरविण्यात आले. सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी विद्यार्थ्याना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपसरपंच अनिल काजळे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रदीप देशमुख, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मीना ढोके, ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती,परंतु गट शिक्षण अधिकारी मानोरा यांचे शाळा न सुरू न करण्याचे आदेश मिळाल्याने विद्यार्थ्यांना पुढील आदेशापर्यंत शाळा बंद असल्याचे सूचित करण्यात आले.