...अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात नवीन इमारतीत स्थलांतरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 03:08 PM2019-01-04T15:08:51+5:302019-01-04T15:08:57+5:30
शिरपूर जैन (वाशिम) : नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण रखडल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आता नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) : नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही दुय्यम निबंधक कार्यालयाचे लोकार्पण रखडल्याचे वृत्त प्रकाशित करून ‘लोकमत’ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत आता नवीन इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू झाले आहे.
मालेगाव तालुक्याचे दुय्यम निबंधक कार्यालय शिरपूर येथील बसस्थानक परिसरात आहे. स्वतंत्र इमारत नसल्याने भाड्याच्या इमारतीत कामकाज सुरू होते. शिरपूरपासून आसेगाव मार्गालगतच्या जागेवर इमारत बांधकामासाठी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने सन २०१२ मध्ये बांधकामाला सुरूवात झाली होती. सन २०१६-१७ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर निधीअभावी संरक्षण भिंतीचे काम रखडले होते. निधी प्राप्त झाल्याने संरक्षण भिंतीचे कामही पूर्ण झाले. तथापि, पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला असतानाही, इमारतीचे लोकार्पण झाले नव्हते. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले होते. याची दखल घेत दुय्यम निबंधक कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरीत होऊन कामकाजही सुरू झाले. दरम्यान, जून्या इमारतीतून नवीन इमारतीत कामकाज सुरू झाले असले तरी अधिकारी, कर्मचाºयांची नगण्य हजेरी ही बाब कायम राहत असल्याची प्रचिती शुक्रवार, ४ जानेवारीदेखील आली.
४ जानेवारी रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात दुपारी १ वाजताच्या सुमारास पाहणी केली असता प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी पी. ए. राठोड हे १ वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित झाले नव्हते. याविषयी आॅपरेटर सुभाष बनसोडे यांना विचारले असता राठोड हे कार्यालयीन कामासाठी वाशिम येथे गेल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे तालुक्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या नागरिकांना मात्र ताटकळत बसावे लागले. सर्व सुविधानिशी करोडो रुपये खर्च करून बांधकाम केलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी, कर्मचाºयांनी वेळेवर हजर राहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.