..अखेर शिवरस्ता झाला मोकळा
By Admin | Published: July 3, 2014 11:30 PM2014-07-03T23:30:13+5:302014-07-04T00:04:32+5:30
न्यायालयाच्या निर्णयानुसार हा मोगलाई शिवरस्ता संबंधित जेष्ठांच्या सहकार्याने मोकळा करण्यात आला आहे
सवड : येथील शेतकर्यांना शेतकामाकरिता शेतात जाणारा सवड रिसोड मोगलाई शिवरस्ता न्यायालयाच्या निर्णयानुसार हा मोगलाई शिवरस्ता संबंधित जेष्ठांच्या सहकार्याने मोकळा करण्यात आला आहे व त्या रस्त्यावरुन शेतकर्यांची ये-जा सुद्धा सुरु झाली आहे.
सवड शेतशिवारातील गट नं.३८८ व रिसोड ५८ मधून जाणारा मोगलाई शिवरस्ता काही शेतकर्यांनी जून २0१२ मध्ये अडविला होता . त्यानंतर सवड येथील शेतकरी अशोकप्रसाद बंकटप्रसाद तिवारी यांनी व इतर शेतकर्यांनी तहसिलदार रिसोड यांच्याकडे अर्ज दाखल केला. या प्रकरणी दोन्ही पक्षाचे जवाब व पुरावे घेवून युक्तीवाद देण्यात आला त्यानुसार ३ जुन १३ रोजी रस्ता मोकळा करुन देण्याचा आदेश रिसोड न्यायालयाने दिला . यावर सवड येथील शेतकरी अशोक प्रसाद तिवारी व इतर शेतकर्यांनी कोर्टाच्या अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला होता . यावरुन तहसिलदार कुंभार, मंडळ अधिकारी पडवे, सवड तलाठी मोरे, रिसोड तलाठी गरकळ यांना सवड रिसोड मोगलाई शिवरस्ता मोकळा करुन देण्याबाबतच्या अंमलबजावणीसाठी गैरअर्जदारांना नोटीसा काढण्यात आल्या. त्या अनुषंगाने स्वत:तहसिलदार अमोल कुंभार मोकळा करुन दिला.