अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:19+5:302021-06-20T04:27:19+5:30

वाशिम : सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना १९ जूनपासून जिल्ह्यातील ३३ केंद्रांत कोरोना प्रतिबंधक ...

Finally start vaccination of citizens in the age group of 30 to 44 years | अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

Next

वाशिम : सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना १९ जूनपासून जिल्ह्यातील ३३ केंद्रांत कोरोना प्रतिबंधक लस देण्याला सुरुवात झाली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नियमानुसार ऑन स्पॉट नोंदणीची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यात पहिल्या लाटेत ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या महिन्यात जनजीवन प्रभावित झाले होते. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे लसीकरणावरही भर देण्यात आला. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याला सुरुवात झाली. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जेमतेम १० दिवस होत नाहीत, तोच लसींचा तुटवडा असल्याचे कारण समोर करून शासनस्तरावरून या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जिल्ह्यात ३२ हजार ९१९ कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये सर्वाधिक १९ हजारांवर रुग्ण हे १८ ते ४५ वयोगटातील आहेत. कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत आहे. सव्वा महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला जिल्ह्यात १९ जूनपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ केंद्रांत हे लसीकरण करण्यात येत असून, या सर्व केंद्रांत ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थी ‘ऑन स्पॉट’ नोंदणी करून लस घेऊ शकतात. प्रथम येणाऱ्या लाभार्थीस प्राधान्य राहील, तसेच केंद्रावर उपलब्ध असलेल्या लसीच्या डोसनुसार लसीकरण करण्यात येईल. ३० ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थींना फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जात आहे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

००००

असे आहेत ३३ केंद्रे

प्राथमिक आरोग्य केंद्रे - २४

ग्रामीण रुग्णालय - ६

कारंजा उपजिल्हा रुग्णालय - १

जिल्हा सामान्य रुग्णालय- १

शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिम - १

००००००००

बॉक्स..

२४ केंद्रांत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण !

४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची सोय जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील लाभार्थींसाठी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.

०००००

कोविशिल्ड लसीचा डोस मिळणार !

३० ते ४४ वयोगटातील लाभार्थींसाठी कोविशिल्ड लसीचाच पहिला डोस मिळणार आहे. तसेच सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस मिळणार आहे.

०००००

एक नजर लोकसंख्या, लसीकरणावर !

जिल्ह्याची लोकसंख्या - १३,८३,४८८

३० ते ४४ वयोगटातील नागरिक - ३,०४,३६७

१८-४४ वयोगटातील लसीकरण (पहिला डोस) - १३३४८

१८-४४ वयोगटातील लसीकरण (दुसरा डोस) - २५५७

००००००००००

कोट

लसीकरण हा कोरोनावर प्रभावी उपाय आहे. लस ही पूर्णत: सुरक्षित असून, प्रत्येक पात्र नागरिकांनी कोणत्याही अफवा, गैरसमजावर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. एकाच लसीचा हट्ट न धरता उपलब्ध लस घ्यावी.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Finally start vaccination of citizens in the age group of 30 to 44 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.