वित्त विभागाची संकेतस्थळे कामकाजासाठी राहणार बंद!
By admin | Published: May 6, 2017 12:54 AM2017-05-06T00:54:53+5:302017-05-06T00:54:53+5:30
६ मे ते १४ मे या कालावधीत ऑनलाईन प्रणाली दोन टप्प्यामध्ये बंद राहणार.
वाशिम : वित्त विभागाशी संबंधित विविध सेवा देणार्या संकेतस्थळांमध्ये नवीन पायाभुत सुविधा व तदनुषंगीक बाबींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्यामुळे ६ मे ते १४ मे या कालावधीत बिम्स, ग्रास, सेवार्थ, नवृत्ती वेतन, बिलपोर्टल, एनपीएस, वेतनिका, कोषवाहीनी, अर्थवाहीनी या ऑनलाईन प्रणाली दोन टप्प्यामध्ये बंद राहणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी शाम तुळजाराम गाभणे यांनी कळविले आहे. पहिला टप्प्यामध्ये बिम्स, सेवार्थ, बिलपोर्टल, वेतनिका, कोषवाहीनी, अर्थवाहीनी या प्रणाली ६ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून ११ मे रोजी सकाळी १0 वाजेपयर्ंत बंद राहतील. दुसर्या टप्प्यामध्ये ग्रास ही प्रणाली १२ मे संध्याकाळी ६ वाजेपासून ते १४ मे संध्याकाळी ६ वाजेपयर्ंत बंद राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, मुद्रांक विक्रेता, आयकर अदाता तथा संबंधित नागरिकांनी यांची नोंद घ्यावी, असे गाभणे यांनी कळविले.