‘अर्थ’ राकाँकडे, तर ‘शिक्षण’ काँग्रेसकडे!

By admin | Published: July 22, 2016 12:59 AM2016-07-22T00:59:09+5:302016-07-22T00:59:09+5:30

जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणूक, कृषी शिवसेनेकडे.

'Finance' to Rakan, 'Education' to Congress! | ‘अर्थ’ राकाँकडे, तर ‘शिक्षण’ काँग्रेसकडे!

‘अर्थ’ राकाँकडे, तर ‘शिक्षण’ काँग्रेसकडे!

Next

वाशिम : जिल्हा परिषद विषय समिती निवडणुकीत काँग्रेस-राकाँ युतीने वर्चस्व कायम राखले असून, सेनेच्या विश्‍वनाथ सानप यांना कृषी व पशुसंवर्धन समितीवर समाधान मानावे लागले. अर्थ व बांधकाम समिती कायम राखण्यात राकाँचे चंद्रकांत ठाकरे यशस्वी झाले असून, शिक्षण व आरोग्य समिती काँग्रेसचे सुधीर गोळे यांच्याकडे गेली आहे. या निवडणुकीत भाजपाच्या सहा सदस्यांसह एकूण १0 सदस्य गैरहजर राहिले.
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने विषय समिती सभापती पदासाठी ८ जुलै रोजी निवडणूक होऊन, यामध्ये सुधीर गोळे (काँग्रेस), पानुताई जाधव (राकाँ), यमुना जाधव (काँग्रेस) व विश्‍वनाथ सानप (शिवसेना) अशा चार सदस्यांची वर्णी लागली होती. अर्थ व बांधकाम, शिक्षण व आरोग्य आणि कृषी व पशुसंवर्धन या विषय समितीचे वाटप करण्यासाठी २१ जुलै रोजी जिल्हा परिषद सभागृहात मतदान घेण्यात आले. सुरुवातीला कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सेनेचे विश्‍वनाथ सानप यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले. अर्थ व बांधकाम समिती निवडणुकीत राकाँचे चंद्रकांत ठाकरे यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले. शिक्षण व आरोग्य समिती निवडणुकीत काँग्रेसचे सुधीर गोळे यांना २९ मते मिळाल्याने ते विजयी झाले. दरम्यान, भाजपाचे सर्वच सदस्य गैरहजर राहिल्याने विविध चर्चांना ऊत आला.

Web Title: 'Finance' to Rakan, 'Education' to Congress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.