दुकाने बंद न ठेवता व्यवसाय करून सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:42 PM2019-02-16T12:42:33+5:302019-02-16T12:42:45+5:30
काने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुलवामा (जम्मू-काश्मिर) येथे १३ फेब्रूवारी रोजी घडलेल्या आत्मघाती हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ४९ जवान शहीद झाले. या घटनेप्रती सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील व्यापाºयांनी १५ फेब्रूवारीला स्वयंस्फूर्तीने सकाळपासून आपापली दुकाने बंद ठेवली; परंतू दुकाने बंद न ठेवता दिवसभर व्यवसाय करून इच्छेनुसार सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वाशिमच्या व्यापारी मंडळाकडून केले जात आहे. त्यास व्यापाºयांनीही प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसत आहे.
जम्मूवरून श्रीनगरला जात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४९ पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरासह वाशिम जिल्ह्यातही सर्वच स्तरातून अक्षरश: संतापाची लाट उसळली असून १४ फेब्रूवारीला जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनात्मक पवित्रा अंगिकारत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. नागरिकांच्या मनातील संतापाचा उद्रेक १५ फेब्रूवारीलाही ठिकठिकाणी दिसून आला. व्यापाºयांनीही स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली. मात्र, दुकाने बंद ठेवून कुठलाच मार्ग निघणार नाही; तर व्यवसाय करून आपापल्या इच्छेनुसार जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे किंवा आॅनलाईन स्वरूपात (सिंडीकेट बँक, साऊथ ब्लॉक ब्रॅन्च, न्यू दिल्ली, आयएफएससी-एस.वाय.एन.बी.०००९०५५, खाते क्रमांक- ९०५५२०१०१६५९१५) अर्थसहाय्य करावे, असे आवाहन व्यापारी मंडळ, युवा व्यापारी मंडळाकडून करण्यात आले.