कुरळाच्या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:45 IST2018-06-05T17:45:17+5:302018-06-05T17:45:17+5:30
मालेगाव :- तालुक्यातील कुरळा येथील देविदास यशवंत कांबळे यांच्या घराला १५ दिवसांपूर्वी आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली.

कुरळाच्या आपत्तीग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत
मालेगाव :- तालुक्यातील कुरळा येथील देविदास यशवंत कांबळे यांच्या घराला १५ दिवसांपूर्वी आग लागल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीपोटी त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली असून, या मदतीच्या धनादेशाचे वितरण मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. तालुक्यातील कुरळा येथील देविदास यशवंता कांबळे यांच्या घराला १५ दिवसांपूर्वी अचानक रात्री आग लागली. या घटनेत त्यांच्या घरातील अन्नधान्यासह इतर गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे आधीच हालाखीच्या स्थितीत असलेले देविदास कांबळे यांच्यावर आर्थिक संकट कोसळून ते निराधार झाले होते. या संदर्भात तलाठ्यांनी पचंनामा करून झालेल्या नुकसानीचा अहवाल तहसील कार्यायालयाकडे सादर करण्यात आला. या अहवालानुसार देविदास कांबळे यांना नैसर्गिक आपत्ती निवारण अंतर्गत १३१०० रुपये आर्थिक मदत मंजूर झाली. त्या मदतीचा धनादेश मालेगावचे तहसीलदार राजेश वझिरे यांचे हस्ते मंगळवारी तहसील कार्यालय मालेगाव येथे कांबळे यांना देण्यात आला, या प्रसंगी लिपिक मठमवार हे उपस्थित होते.