अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना खासदारांकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 13:25 IST2018-10-02T13:24:49+5:302018-10-02T13:25:16+5:30
हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतक कुटूंबियांना सांत्वनपर भेट देताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली.

अपघातातील मृतकाच्या कुटुंबियांना खासदारांकडून आर्थिक मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : बुलडाणा जिल्ह्यातील ब्राम्हण चिकना गावानजिक २३ सप्टेंबरला झालेल्या अपघातात शिरपूर येथील दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मृतकाच्या कुटूंबियांना सांत्वनपर भेट देताना खासदार भावना गवळी यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची रोख मदत केली.
२३ सप्टेंबरच्या या अपघातात भर जहाँगीर येथील ज्ञानेश्वर डोंगरे (१९), अरूण कांबळे (२२), राजू कांबळे (२३) तसेच शिरपूर जैन येथील प्रविण कांबळे (२५) व गणेश बांगरे (३२) असे पाच जण ठार झाले; तर अन्य १३ जण जखमी झाले होते. दरम्यान, या अपघातात घरातील कर्ते पुरूष संपल्याने मृतकांच्या कुटुंबियांसमोर उदरनिर्वाहाचा पेच निर्माण झाला. खासदार भावना गवळी यांनी यापूर्वी भर जहॉगीर येथे मृतकाच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते तसेच जखमींच्या उपचाराचा काही खर्च उचलण्याचे आश्वासनही दिले. १ आॅक्टोबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास खासदार गवळी यांनी शिरपूर येथे सांत्वनपर भेट दिली. यावेळी मृतक प्रवीण कांबळे याच्या आईला तसेच गणेश बांगरे यांच्या पत्नीला प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत दिली. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प. सभापती सभापती विश्वनाथ सानप, अशोकराव अंभोरे, विजय अंभोरे, दिलीप विश्वंभर, दिनकर पुंड, गणेश अंभोरे, दिलीप विश्वंभर, श्याम दीक्षित, कैलास भालेराव, गोपाल वाढे, सुलतान भाई, असलम खा पठाण आदी उपस्थित होते.