मृतकांच्या वारसांना अर्थसहाय्य !

By admin | Published: July 3, 2017 08:08 PM2017-07-03T20:08:24+5:302017-07-03T20:08:24+5:30

मृत व्यक्तिच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दहा लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले.

Financial Assistant to the deceased! | मृतकांच्या वारसांना अर्थसहाय्य !

मृतकांच्या वारसांना अर्थसहाय्य !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृत व्यक्तिच्या वारसांना अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. ३ जुलै रोजी १० मृत व्यक्तिच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दहा लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले.
मृत व्यक्तिच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळावे यासाठी आमदार अमित झनक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मालेगाव तालुक्यातील एक व रिसोड तालुक्यातील नऊ अशा एकूण १० मृत व्यक्तिच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दहा लाख रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले. मोठेगाव येथील पूजा राजू धांडे, प्रीती अशोक घोंगडे, रिसोड येथील जान्हवी महाविर क्षीरसागर, मुरलीधर जहिरव, नेतन्सा येथील विनोद बाजड, नारायण बाजड, पेनबोरी येथील विजय शिंदे, केनवड येथील संतोष पारेकर, धोडप येथील प्रल्हाद डोंगरे आदी मृतकांच्या वारसांना सदर अर्थसहाय्य देण्यात आले.
यावेळी आमदार अमित झनक, बबनराव गारडे, डॉ. संतोष बाजड, मधुकरराव काळे, बाबुराव शिंदे, घोडे, नारायण बाजड, पप्पू बाजड, प्रदीप पांढरे, गोविंद गोळे, संदीप गोळे, संदीप खराटे, विक्रम भंडारकर, ए.ए. मोरे, चंदु वाशिमकर, ब्रह्मदेव धांडे, विठ्ठल पिसाळ, गजानन कांबळे, मनोज केनवडकर, मोहोम्मद तसलीम, विनोद घुगे, बबन बोरकर, श्रीकांत सुरूसे, शंकर बोरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

 

Web Title: Financial Assistant to the deceased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.