विनाअनुदानित शिक्षकांसमोर पुन्हा आर्थिक संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:55 AM2021-02-25T04:55:57+5:302021-02-25T04:55:57+5:30

सन २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने अनेक क्षेत्र प्रभावित झाले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षातील मार्च ...

Financial crisis again in front of unsubsidized teachers! | विनाअनुदानित शिक्षकांसमोर पुन्हा आर्थिक संकट!

विनाअनुदानित शिक्षकांसमोर पुन्हा आर्थिक संकट!

Next

सन २०२० मध्ये कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाने अनेक क्षेत्र प्रभावित झाले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत वर्षातील मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. सरकारी, अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेवरील शिक्षकांना नियमित वेतन असल्याने त्यांना आर्थिक संकटाशी दोन हात करण्याची वेळ आली नाही. परंतु, कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी कॉन्व्हेंटमध्ये कार्यरत अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक कोंडीतून जावे लागले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावी आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते. त्यामुळे कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित व इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने जिल्ह्यातील पाचवी ते बारावीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची भीती विनाअनुदानित, कॉन्व्हेंटच्या शिक्षकांमधून वर्तविण्यात येत आहे.

....................

बॉक्स

विनाअनुदानित, अघोषित माध्यमिक शाळा - ४

विनाअनुदानित वर्ग तुकड्या - ४

या शाळांवरील एकूण शिक्षक - ६०

स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित प्राथमिक शाळा - १५२

या शाळांवरील एकूण कर्मचारी - १६७२

००००००००००००००००

बॉक्स

खासगी शिक्षकांच्या मागण्या

१) विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा.

२) कोरोनाचे संकट टळेपर्यंत विनाअनुदानित, कॉन्व्हेंटवरील शिक्षकांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे.

३) सुशिक्षित बेरोजगारांना जसा भत्ता दिला जातो, त्याप्रमाणे खासगी शिक्षकांनाही या आर्थिक संकटाच्या काळात भत्ता देण्यात यावा.

Web Title: Financial crisis again in front of unsubsidized teachers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.