बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:56+5:302021-02-07T04:37:56+5:30
यावेळी मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती दीपाली इंगोले, उषा सरनाईक, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कोठाळे, डोफेकर, माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी ...
यावेळी मंगरूळपीर पंचायत समितीच्या सभापती दीपाली इंगोले, उषा सरनाईक, जिल्हा परिषद सदस्या सुनिता कोठाळे, डोफेकर, माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी केशव पवार, आयसीआयसी बँकेचे विभागीय अधिकारी अमित शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, सहाय्यक समन्वय अधिकारी समीर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्योती ठाकरे म्हणाल्या की, बचत महिलांचा गुण आहे. घरात कोणतीही वस्तू आणताना त्यामध्ये बचत कशी होईल, हे महिला पाहतात. बचत गटामुळे महिलांना आर्थिक पाठबळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. याठिकाणी बचत गटांनी लावलेल्या स्टॉलला ज्योती ठाकरे यांनी भेट दिली तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनेविषयी माहिती घेतली. या मेळाव्यात वरुड येथील ज्ञानेश्वरी महिला बचत गटाला ७ लक्ष ४९ हजार रुपये, नवीन सोनखास येथील अष्टभुजा महिला बचत गटाला ६ लक्ष २५ हजार रुपये, सखी महिला बचत गटाला ५ लक्ष ५२ हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
राधाकृष्ण महिला बचत गटाच्या कापड केंद्रालाही ज्योती ठाकरे यांनी भेट दिली. भरारी महिला बचत गटामार्फत सुरु करण्यात आलेल्या दूध संकलन केंद्राचे उद्घाटनही ज्योती ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी गटाच्या अध्यक्ष लता भगत व सर्व सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक सीमा मनवर यांनी आभार मानले.