आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना अर्थसहाय्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 07:58 PM2018-01-31T19:58:58+5:302018-01-31T20:02:12+5:30
वाशिम : क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक करण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडाविषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभुत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख या बाबी विचारात घेऊन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येत असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

क्रीडा संचालनालयामार्फत १४ अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (आॅलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशिएन चॅम्पियनशिप, युथ आॅलिम्पिक, ज्युनियर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, पॅरा आॅलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप) सहभागी झालेल्या खेळाडूंना अर्थसहाय्य देण्यात येते. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.