नियमांचे उल्लंघन प्रकरणी ४५ लाख रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:24+5:302021-06-18T04:28:24+5:30

वाशिम : कोरोना संसर्ग पाहता साथरोग नियमांच्या पालन सह वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी ...

A fine of Rs 45 lakh for violating the rules | नियमांचे उल्लंघन प्रकरणी ४५ लाख रुपये दंड

नियमांचे उल्लंघन प्रकरणी ४५ लाख रुपये दंड

Next

वाशिम : कोरोना संसर्ग पाहता साथरोग नियमांच्या पालन सह वाहतूक नियमांचे पालन करण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी केलेल्या सूचनेवरून शहरात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४५ लाख रुपयांचा दंड गत ४ महिन्यात वसूल करण्यात आला. याकरिता शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नागेश मोहोड यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.

काेराेना संसर्ग कमी झाल्याबराेबर नागरिक बिनधास्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे शहरात दिसून आल्याने कडक कारवाई माेहीम हाती घेण्यात आली आहे. गत आठ दिवसात लाखाे रुपयांचा दंड वाहनधारकांना केला गेला. काेराेना काळातील गत ४ महिन्यात शहर वाहतूक शाखेतर्फे ६,१९५ विविध प्रकारच्या केसेस करुन वाहनधारकांकडून एकूण ४५ लाख २० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक दंड हा विनामास्क फिरणाऱ्यांवर करण्यात आला आहे. शहरात प्रथमच विना हेल्मेट माेठ्या प्रमाणात दंड करण्यात आला असून यामध्ये १५८ जणांचा समावेश दिसून येत आहे.

..............

ट्रीपल सीट २,८६२ केसेस दंड ५,७२,४००

विनमास्क ३,११३ दंड १५,५६,५००

विना हेल्मेट १५८ दंड ७९,०००

नो पार्किंग ६५६ दंड १,३१,२००

मोबाईलवर बोलणे १,०८७ दंड २,१७,४००

विना नंबर प्लेट ४२८ दंड ८५,६००

फॅन्सी नंबर १,७६० दंड ३,५२,००१

विना लायसन्स ६,१९५ दंड १२,३९,०००

एकूण ४५ लाख २० हजार ३००

एकूण केसेस १,६,९४७

Web Title: A fine of Rs 45 lakh for violating the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.