कंत्राटदारावर दाखल होणार ‘एफआयआर’!

By admin | Published: June 19, 2017 04:15 AM2017-06-19T04:15:26+5:302017-06-19T04:15:26+5:30

वीज चोरीचे प्रकरण; कार्यकारी अभियंत्यांचे कारवाईचे निर्देश

'FIR' to be filed on contractor! | कंत्राटदारावर दाखल होणार ‘एफआयआर’!

कंत्राटदारावर दाखल होणार ‘एफआयआर’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : नालीचे बांधकाम सुरू असताना वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून चोरीची वीज वापरली जात असल्याचा गंभीर प्रकार ह्यलोकमतह्णने १६ जूनला केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णमधून उजागर झाला. दरम्यान, यासंदर्भात १८ जूनच्या अंकात ह्यबांधकाम विभागाच्या कामांवर विजेची चोरीह्ण या मथळ्याखाली प्रकाशित वृत्ताची तडकाफडकी दखल घेत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी उपअभियंत्यांना संबंधित कंत्राटाराविरूद्ध कलम १३५ अन्वये ह्यएफआयआरह्ण दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
वाशिम शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतिने विविध विकासकामे सद्या सुरू आहेत. यामध्ये रस्ते, भूमिगत गटार योजनांचे चेंबर, नाली बांधकाम, नालीवर ढापे उभारणे यासह इतर अनेक कामांचा समावेश आहे. दरम्यान, सदर कामे करताना काही ठेकेदार वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून चक्क चोरीची वीज वापरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरुन ह्यलोकमतह्णच्या चमुकडून संबंधित स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी योजना दिप कॉलनीमध्ये नाली बांधकामादरम्यान सुरू असलेल्या ढापे टाकण्याच्या कामाकरिता सेंट्रींगच्या लाकूड कटाईसाठी चोरीची वीज वापरली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी १८ जूनच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची तडकाफडकी दखल घेवून महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी उपअभियंता रविंद्र व्यवहारे यांना संबंधित कंत्राटदाराविरूद्ध विद्यूत अधिनियम २00३ मधील कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे; तर संबंधित कंत्राटदारास विजचोरी केल्याप्रकरणी आकारण्यात येणारा दंड देखील भरावा लागेन, असे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले.

Web Title: 'FIR' to be filed on contractor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.