वाशिम : दिपाली गृह उद्योगाला आग, ५० लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 04:09 PM2018-03-20T16:09:32+5:302018-03-20T16:09:32+5:30

वाशिम : स्थानिक स्वामी समर्थ नगरमधील दिपाली गृह उद्योगाला २० मार्च रोजी पहाटे २ वाजताच्या रात्री दरम्यान भिषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ५० लाखाच्या जवळपास नुकसान झाले.

fire broke out at washim; shop burnt | वाशिम : दिपाली गृह उद्योगाला आग, ५० लाखाचे नुकसान

वाशिम : दिपाली गृह उद्योगाला आग, ५० लाखाचे नुकसान

Next
ठळक मुद्दे दिपाली गृह उद्योग मसाला व्यवसायाला आग लागून अंदाजे तीस लक्ष रुपयांचे नुकसान झाले. मर्थ नगरातील दिपाली राहुडकर व पुरुषोत्तम रामकृष्ण हरणे यांच्या विविध व्यावसायिक प्रतिष्ठानला आग लागली. अग्निशमन पथकाने वेळेचा विलंब न करता अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळावर पाठविली.

वाशिम : स्थानिक स्वामी समर्थ नगरमधील दिपाली गृह उद्योगाला २० मार्च रोजी पहाटे २ वाजताच्या रात्री दरम्यान भिषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये जवळपास ५० लाखाच्या जवळपास नुकसान झाले.

स्वामी समर्थ नगरामध्ये दिपाली गृह उद्योगाव्दारे विविध उद्योग, व्यवसाय केल्या जातात. यामध्ये मसाला , भोजनालय, वाचनालय, पाणी शुध्दीकरण केंद्र, घरगुती वस्तुसह ईतर उद्योग चालविल्या जातात. १९ मार्च रोजी रात्री उशिरा १ ते १.३० वाजताच्या दरम्यान वाºयासह पावसास सुरुवात झाली. यामध्ये विद्युत तारा घर्षण झाल्याने शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली. सर्वप्रथम दिपाली गृह उद्योग मसाला व्यवसायाला आग लागून अंदाजे तीस लक्ष रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये मसाला पदार्थ, मशिनसह ईतर साहित्य जळून खाक झालेत. आगीची भिषणता एवढी गंभीर होती की, आगीने बाजुच्या दुकानांमध्येही सुध्दा पेट घेतला यामध्ये आनंद अ‍ॅक्वामधील वॉटर मशिन व ईतर साहित्य जळून खाक झाले. जवळपास १५ लाख रुपयांचे हे साहित्य असल्याचे समजते. तसेच बाजुलाच असलेल्या सोफा सेट व ईतर इलेक्ट्रॉनिक वस्तुही जळून ५० लाखाच्यावर यामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन पथकाला भ्रमणध्वनी करुन सांगीतले की, समर्थ नगरातील दिपाली राहुडकर व पुरुषोत्तम रामकृष्ण हरणे यांच्या विविध व्यावसायिक प्रतिष्ठानला आग लागली. अग्निशमन पथकाने वेळेचा विलंब न करता अग्नीशमन दलाची गाडी घटनास्थळावर पाठविली. अग्निशमन अधिकारी विवेक माकोडे आग विझेपर्यंत घटनास्थळी आपल्या पथकासह हजर होते. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन पथकातील आॅपरेटर रवी सुरोशे, विजय कुलकर्णी, फायरमन प्रशांत पाटणकर, संतोष आळणे, विजय काळे, सोनू डोंगरे, ओम अर्धपूरकर, अरुण सुरोशे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. 

Web Title: fire broke out at washim; shop burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.