सामाजिक न्याय भवनातील अग्निरोधक यंत्र कालबाहय़!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:23 AM2017-09-11T02:23:23+5:302017-09-11T02:23:30+5:30
वाशिम: सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त कार्यालयासह महात्मा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत रविदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळ, जात पडताळणी आदी महत्त्वाची कार्यालये असणार्या सामाजिक न्याय भवनातील अग्निअवरोधक यंत्र ११ महिन्यांपासून मुदतबाह्य ठरली असताना प्रशासनाचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सामाजिक न्याय भवनात असलेल्या कार्यालयांमध्ये अनेक जुने तथा महत्त्वपूर्ण दस्तावेज असून, एखादवेळी आगीची घटना घडल्यास त्यापासून या दस्तावेजांना कुठलाही धोका उद्भवू नये, या उद्देशाने तद्वतच अधिकारी, कर्मचारी, कामानिमित्त येणार्या नागरिकांच्या जीवित्वाची सुरक्षा म्हणून ठिकठिकाणी ‘वॉटर टाइप’ अग्निरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत.
या यंत्रांची शेवटची ‘रिफिलिंग’ ऑक्टोबर २0१४ मध्ये झाली होती. तेव्हापासून पुढील २ वर्षे अर्थात ऑक्टोबर २0१६ पर्यंत त्याची मुदत होती; मात्र सप्टेंबर २0१७ लागूनही या यंत्रांची ‘रिफिलिंग’ करण्यात आलेली नाही. यामुळे मात्र सामाजिक न्याय भवनात एखादवेळी आगीची घटना घडल्यास त्यापासून बचावाच्या प्रभावी उपाययोजना नाहीत. या गंभीर बाबीकडे संबंधित अधिकार्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.