अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 11:22 AM2021-03-01T11:22:07+5:302021-03-01T11:22:16+5:30
Washim Fire Brigade Department १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी नऊ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात असलेल्या मंजूर पदांपैकी २५ टक्के पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांवर अग्निशमन विभागाचा गाडा चालविण्यात येत आहे. भरती करण्यात आलेल्या १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी नऊ कर्मचारी अप्रशिक्षित आहेत.
वाशिम नगरपरिषद हद्दसह ईतर ठिकाणी आग लागल्यास धावून जाणाऱ्या नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात २०१३ पासून भरतीच झाली नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम येथील अग्निशमन विभागाकरिता ११ पदे मंजूर असताना केवळ तीन कर्मचारी आहेत. या तीन कर्मचाऱ्यांसह १३ सेवार्थी (कंत्राटवर) काम करताहेत. यांपैकी ९ जणांना काेणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसताना त्यांच्या भरवशावर कार्यरत तीन कर्मचारी यांच्याकडून कार्य करून घेत आहेत. विशेष म्हणजे चार फायरमन पदांपैकी केवळ एकच फायरमन आहे. अशावेळी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यावे लागत आहे.
वाशिमात केवळ ७ कर्मचारीच प्रशिक्षित
वाशिम येथील अग्निशमन विभागात एकूण ११ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ तीन पदे सहायक स्थानक, पर्यवेक्षक वाहनचालक व एक फायरमन प्रशिक्षित आहेत. सेवार्थी ४ प्रशिक्षित आहे.
कंत्राटी पद्धतीने सेवार्थी मजूर असून यांना काेणत्याच प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले नाही. ते अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानुसार कार्य करताहेत.
११ पैकी ८ पदे रिक्त असल्याने केवळ तीन कर्मचाऱ्यांवर नगरपालिकेचा अग्निशमन विभागाचा गाडा चालविला जात आहे. मदतीला सेवार्थी घेण्यात आलेत.
वाशिम येथील अग्निशमन विभागामध्ये मी नुकताच कार्यरत झालाे आहे. अग्निशमन विभागातील रिक्त पदासंदर्भात २०१३ मध्ये प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर अद्याप काेणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.
- गजानन गाेरे, प्रभारी, अग्निशन विभाग प्रमुख, वाशिम