आरोग्य केंद्रात अग्नीरोधक यंत्र स्थापित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:22+5:302021-08-19T04:45:22+5:30
वाशिम : जिल्ह्यात फायर व इलेक्ट्रीक ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे ...
वाशिम : जिल्ह्यात फायर व इलेक्ट्रीक ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे ५० अग्निरोधक यंत्र स्थापित झाले आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात २५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १५२ उपकेंद्र अशा एकूण १७७ रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्र होती; मात्र ती कालबाह्य झाल्याने एखादवेळी आगीची घटना घडल्यास रुग्णांचा जीव धोक्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली होती. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे फायर ऑडिट करून केंद्रांमध्ये प्रत्येकी दोन; तर उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी एक अग्निरोधक यंत्र मे महिन्यातच स्थापित करण्यात आले. गत तीन महिन्यात वेळोवेळी पाहणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील फायर व इलेक्ट्रीक व्यवस्थेची वेळोवेळी पाहणी करण्यात आली असून, यावर विशेष वाच असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.