‘वायरिंग’ जळाल्यामुळे मालवाहू वाहनाला आग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 12:12 PM2020-03-05T12:12:59+5:302020-03-05T12:14:00+5:30

वाहन जळले असले तरी, चालकाला कसलीही दुखापत झाली नाही. 

Fire to freight vehicle due to 'wiring' burns | ‘वायरिंग’ जळाल्यामुळे मालवाहू वाहनाला आग 

‘वायरिंग’ जळाल्यामुळे मालवाहू वाहनाला आग 

Next
ठळक मुद्दे‘वायरिंग शॉट’ झाल्यामुळे वाहनाने अचानक पेट घेतला. ग्रामस्थांनी पेटलेल्या वाहनातील तूर आणि हरभºयाची पोती खाली ओढून घेत वाचविली.चालक अनिल राऊत यांनाही कसली दुखापत झाली नाही.

लोकमत न्युज नेटवर्क
उंबर्डाबाजार (वाशिम) : धावत्या मालवाहून वाहनातील ‘वायरिंग शॉट’ झाल्यामुळे आग लागून वाहनाने पेट घेतला. ही घटना  कारंजा-दारव्हा  मार्गावरील गंगापूर फाट्यानजिक ५ मार्च रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात वाहन जळले असले तरी, चालकाला कसलीही दुखापत झाली नाही. 
 दारव्हा तालुक्यातील  दुधगाव येथील अनिल राऊत हे  एम एच, टी - ५५४८ क्रमांकाच्यो चारचाकी वाहनात गावातील तूर अणि हरभरा कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती घेऊन येत असताना मार्गावरील गंगापूर फाट्यानजिक या वाहनातल ‘वायरिंग शॉट’ झाल्यामुळे वाहनाने अचानक पेट घेतला. त्यावेळी लगतच असलेल्या काही सेवाभावी ग्रामस्थांनी पेटलेल्या वाहनातील तूर आणि हरभºयाची पोती खाली ओढून घेत वाचविली, तर चालक अनिल राऊत यांनाही कसली दुखापत झाली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कारंजा नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझविली; परंतु आगीवर नियंत्रणापूर्वीच वाहनाचा समोरचा भाग पूर्णपणे खाक झाला होता.

Web Title: Fire to freight vehicle due to 'wiring' burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.