राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 06:11 PM2019-01-11T18:11:56+5:302019-01-11T18:12:55+5:30

राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली.

Fire at Godown in Rajura; 20 lakhs of material burnt | राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

राजुरा येथील गोडाऊनला आग; २० लाखांचे साहित्य जळून खाक 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूरा (वाशिम) : येथील साई एजन्सीच्या गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत जवळपास २० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा माल जळून खाक झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतादरम्यान घडली. यामध्ये समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचाही समावेश आहे. 
राजुरा ते खैरखेडा मार्गावरील अनसिंग फाटयावर अमित शिवाजीराव घुगे यांच्या मालकीचे साई एजन्सीच्या माल साठविण्याचे गोडाऊन आहे. घुगे यांच्याकडे नामांकित कंपनीबरोबरच गावातीलच समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठीची एजन्सी आहे. या एजन्सीच्या माध्यमातून उत्पादित कंपन्याचे बर्फी, गुलाब जामून, चॉकलेट, चिवडा, बिस्कीट, लोणचे, मॅगी, नुडल्स, ब्रेड, केक यासह इतरही उत्पादने वाशिम, अकोला जिल्हयातील शहरे व गावात दररोज वितरीत केल्या जातात. विविध प्रकारचा हा माल तसेच कापूस व शेतीपयोगी साहित्यही गोडावूनमध्ये ठेवले होते. ११ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गोडावूनमधून वितरणासाठीची गाडी भरून देवून अमित घुगे घरी गेले असता, १० वाजतादरम्यान त्यांचे गोडाऊनला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. या आगीत गोडावूनमधील संपूर्ण माल जळून खाक झाल्याचे दिसून आले. सदर गोडावून हे गावापासून थोडे अंतरावर शेतात असून त्या ठिकाणी आग विझविण्यासाठी उपाययोजना नसल्याने वाशिम येथील अग्निशामक दल यासह महसूल व पोलिस प्रशासनाला तात्काळ कळविण्यात आले. मात्र अग्निशामक दलाची गाडी पोहचविण्यापुर्वीच गोडावूनमधील माल पुर्णत: जळून खाक झाला होता. घुगे यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
यामध्ये अमित घुगे यांचे जवळपास २० लाख २७ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अहवाल तलाठी नागेशराव घुगे यांनी वरिष्ठांकडे सादर केला आहे. घटनास्थळावर तलाठी नागेशराव घुगे, पोलिस पाटील डॉ.धनंजय राजुरकर, बिट जमादार उत्तम राठोड, पोलिस कर्मचारी पाटील यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेत मदत कार्यात सहभाग घेतला. 


समर्थ बचत गटही आर्थिक संकटात 
राजूरा येथे कार्यरत समर्थ महिला बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल हा साठवणुकीसाठी घुगे यांच्या गोडावूनमध्ये ठेवत असत. या आगीत त्यांचाही बराचसा माल जळून खाक झाल्याने बचत गटाच्या महिलांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यापुढे कच्चा मालाच्या खरेदीसासाठी आर्थिक संकट ओढावल्याने महिला हतबल  झाल्याचे दिसून येते. रोजगारावरच पाणी फिरल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Fire at Godown in Rajura; 20 lakhs of material burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.