मंगरूळपीर येथे आग; लाखो रुपयांची हानी!

By admin | Published: May 28, 2017 04:07 AM2017-05-28T04:07:35+5:302017-05-28T04:07:35+5:30

शेतातील गोठय़ाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

Fire at Mangurpur; Loss of millions of rupees! | मंगरूळपीर येथे आग; लाखो रुपयांची हानी!

मंगरूळपीर येथे आग; लाखो रुपयांची हानी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या लक्ष्मी कॉटन मिलनजिकच्या शेतातील गोठय़ाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. २७ मे रोजी सायंकाळी सहा वाजता घडलेल्या या घटनेत लाखो रुपयांचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.
याबाबत अधिक माहितीनुसार, मंगरूळपीर शहरालगत लक्ष्मी कॉटन जीनजवळ श्याम बाहेती यांचे शेत आहे. शेतामध्येच त्यांचा गोठा व रखवालदाराच्या कुटुंबीयांसाठी टिनाचे घर व शेती साहित्य ठेवण्याकरिता गोदाम आहे. २७ मेच्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रस्त्यावरून गेलेल्या मुख्य विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ह्यशॉर्ट सर्किटह्ण झाला. यामुळे गोठय़ानजिक आग लागली. सोसाट्याच्या वार्यामुळे क्षणातच आग पसरल्याने त्यात गोठा, रखवालदाराचे घर व शेतीपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात ठिबक सिंचनचे संच, स्प्रिंकलर साहित्य, पाइप, मोटरपंप, फवारणी यंत्रे, रखवालदाराच्या घरातील सर्व साहित्य यांसह केळीच्या बागेलासुद्धा आगीची झळ झागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, ठाणेदार जायभाये यांनी भेट देऊन पाहणी केली; मात्र आग लागून तब्बल दीड तास अग्निशमनचे वाहन दाखल झाले नव्हते.

Web Title: Fire at Mangurpur; Loss of millions of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.