सोमठाणा घाटातील जंगलाला आग; वनसंपदा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 03:57 PM2019-05-14T15:57:51+5:302019-05-14T15:58:26+5:30
आगीत जवळपास १० हेक्टर जमीनीवरील वनसंपदा जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.
उंबर्डाबाजार: कारंजा - सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटातील खालच्या भागातील जंगलाला १४ मे रोजी दुपारी दिड वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत जवळपास १० हेक्टर जमीनीवरील वनसंपदा जळून खाक झाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले.
कारंजा सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या कारंजा दारव्हा मार्गावरील सोमठाणा घाटात खालच्या बाजूच्या जंगलालाआग लागल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनपाल डी . व्ही. बावनथडे यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले .मात्र आगीने जंगलाचा मोठा भाग व्यापल्याचे दिसून आल्याने त्यांनी कारंजा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला कळविताच कारंजा नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या गाडीने तातडीने घटनास्थळ गाठुन वनविभागाच्या कर्मचारी वर्गांच्या साह्याने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केले . या आगीत जवळपास १० हेक्टर जमीन वरील वनसंपदा जळून खाक झाल्याने वनविभागाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही .