उसाच्या शेतीला आग लागून तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:16 PM2019-03-27T18:16:19+5:302019-03-27T18:16:31+5:30
वाकद (वाशिम) : वाकद येथील महिला शेतकरी चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांच्या उसाच्या शेताला आग लागून उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले.
वाकद येथील घटना : सुक्ष्म सिंचनाचे पाईपही जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकद (वाशिम) : वाकद येथील महिला शेतकरी चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांच्या उसाच्या शेताला आग लागून उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. यात तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना २६ मार्च रोजी घडली.
वाकद येथे चंद्रकलाबाई सुधाकर जटाळे यांचे गट क्र. ४१२ मध्ये शेत असून त्यावर उसाची लागवड करण्यात आलेली आहे. त्यापैकी काही उसाची तोडणी केली होती; तर ०.६० हेक्टर आर क्षेत्रातील उसाची तोडणी बाकी होती. दरम्यान, २६ मार्च रोजी शेताला अचानक आग लागली. त्यात उस व सुक्ष्म सिंचनाचे पाईप जळून खाक झाले. घटनेचे वृत्त कळताच कृषी सहाय्यक, तलाठी, लाईनमन यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. ऐन दुष्काळी परिस्थितीत झालेल्या या नुकसानामुळे श्ेतकरी जटाळे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून आपणास त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घटनेचा पंचनामा करतेवेळी तलाठी कल्याणकर, कृषी सहाय्यक बी.बी. पुंड, लाईनमन साबळे, शेतकरी उद्धवराव जटाळे, सुधाकर जटाळे आदिंची उपस्थिती होती.