गोठ्याला आग; शेतीपयोगी साहित्य जळून खाक
By सुनील काकडे | Published: March 30, 2024 06:15 PM2024-03-30T18:15:43+5:302024-03-30T18:16:19+5:30
शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत.
वाशिम : जिल्ह्यातील धामणी (ता.मानोरा) येथील दादाराव सखाराम पाटील यांचे गावात असलेल्या गट क्रमांक ६० मधील गोठ्याला २८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात शेतीपयोगी विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाले. यामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी पाटील संकटात सापडले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, २८ मार्च रोजी गोठ्याला अचानक आग लागली. घटनेची वार्ता कळताच आसपासच्या लोकांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र त्यात यश आले नाही. सुदैवाने गुरे नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र गोठ्यात ठेवून असलेले स्प्रिंकलर पाईप, टीनपत्रे, कुटार यासह हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. धामणी येथील तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्याचा अहवाल तहसिलदारांकडे सादर केला आहे. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी दादाराव पाटील यांनी केली आहे.