प्रथमेश सोनुनेचे फुटबॉलमध्ये यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:35 AM2021-02-08T04:35:52+5:302021-02-08T04:35:52+5:30
००००००० बॉटलमध्ये पेट्रोल दिल्यास कारवाई वाशिम : काही दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून देशीदारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न एका इसमाने केला होता. ...
०००००००
बॉटलमध्ये पेट्रोल दिल्यास कारवाई
वाशिम : काही दिवसांपूर्वी पेट्रोल टाकून देशीदारूचे दुकान जाळण्याचा प्रयत्न एका इसमाने केला होता. या पृष्ठभूमीवर पोलिसांनी बॉटलमध्ये पेट्रोल दिल्यास कारवाई करण्याचा इशारा पेट्रोलपंपांना दिला आहे.
००००००
पुसद नाक्यावरील वाहतूक विस्कळीत
वाशिम : अकोला, अमरावती आणि नांदेड या जिल्ह्यांमधून येणारी वाहने स्थानिक पुसद नाक्यावरून वळण घेतात. यामुळे दिवसभरातून अनेकवेळा याठिकाणची वाहतूक विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे.
.............
रिक्त पदांमुळे रुग्णसेवा प्रभावित
जऊळका रेल्वे : परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांची २० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. एएनएम, एमपीडब्ल्यू कर्मचारी नसल्याने रुग्णसेवा वारंवार प्रभावित होत असून लक्ष पुरविण्याची मागणी मंगेश चंदनशिव यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.
००००००
विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन
वाशिम : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे महत्व ओळखून शासनाने विविध मागण्यांची पूर्तता करावी, यासाठी मानव हित लोकशाही संघटनेच्यावतीने सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रल्हाद लगड यांनी जिल्हाधिऱ्यांना निवेदन दिले.
...............
टाळेबंदीतील देयके माफ करण्याची मागणी
वाशिम : महावितरणने टाळेबंदी काळातील वीज वापराची देयके सरसकट माफ करावी, अशी मागणी मनसेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनीष डांगे यांनी वीज नियामक आयोग, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांकडे शनिवारी पाठविलेल्या निवेदनात केली.
००००००
शेतकऱ्यांकडून फळबागांची पाहणी
मेडशी : पारंपरिक पिकांना फाटा देत परिसरातील काही शेतकऱ्यांनी फळबागा विकसित केल्या आहेत. रविवारी वाशिम येथील रवि मारशेटवार यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी या फळबागांची पाहणी केली.
०००००००
कागदपत्रांमधील त्रुटी निवारण्यास प्रारंभ
वाशिम : काही लाभार्थींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने २०८ घरकुलांची कामे प्रलंबित होती. दरम्यान, गुरूवार, ४ फेब्रूवारीपासून विशेष मोहीम हाती घेऊन त्रुटी निवारण्यास प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.