पहिल्याच दिवशी १४०० प्रवाशांनी केला लालपरीतून प्रवास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 11:20 AM2020-08-22T11:20:46+5:302020-08-22T11:20:59+5:30
. जिल्हयात असलेल्या ४ आगाराच्या २५ बसेसव्दारे ७८ फेऱ्या करण्यात आल्यात. याव्दारे ४७ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न आगाराला झाले.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या २३ मार्चपासून बंद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीला गुरुवार २० आॅगस्टपासून सुरुवात करण्यात आली. यात पहिल्याच दिवशी १४०७ प्रवाशांनी प्रवास केला. जिल्हयात असलेल्या ४ आगाराच्या २५ बसेसव्दारे ७८ फेऱ्या करण्यात आल्यात. याव्दारे ४७ हजार ४९४ रुपयांचे उत्पन्न आगाराला झाले.
वाशिम जिल्हयात वाशिम, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर असे चार आगार आहेत. कोरोनाच्या पृष्ठभूमिवर २३ मार्चपासून एसटी बस बंद करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. एसटी महामंडळाने २० आॅगस्टपासून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे निर्देश सर्व विभागांना दिले. त्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून वाशिम जिल्हयात एसटी बस धावली. अनेक महिन्यापासून बंद असलेली बस सुरु झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला . तर अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा या लगतच्या जिल्ह्यातील एक दोन बसफेºया वगळता परजिल्ह्यातील फेºया वाशिम जिल्ह्यात आल्या नसल्या तरी जिल्हयात चारही आगाराच्या बसेसने ७८ फेºया केल्यात. यामध्ये वाशिम आगारातून ७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसनी १८ फेºयाव्दारे ११७७ कि.मी. प्रवास केला. यामध्ये ३५० प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये आगाराला १२३६० रुपये उत्पन्न मिळाले. रिसोड आगारातून ६ बसेसव्दारे २० फेºया, ९९० कि.मी. प्रवाव २११ प्रवाशांनी केले. आगाराचे कलेक्शन ८२५० रुपये ऐवढे झाले. कांरजा आगारातून ५ बसेसव्दारे २२ फेºया करुन ११०० कि.मी. प्रवास ४६० प्रवाशांनी केले. यामधून आगाराला १७८०० रुपये मिळालेत. तसेच मंगरुळपीर आगारातून ७ बसेस सोडण्यात आल्या होत्या. ७ बसेसव्दारे १८ फेºया , ९४६ कि.मी. प्रवास ३८६ प्रवाशांनी केला. यामधून आगाराला ९०८४ रुपये उत्पन्न झाले. पहिल्याच दिवशी बसला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे जिल्हयातील चारही आगारप्रमुखांनी सांगितले.