जूनच्या पूर्वार्धातच मासिक सरासरीच्या १८७ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:59+5:302021-06-19T04:26:59+5:30
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९ मि.मी. पाऊस पडतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ...
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९ मि.मी. पाऊस पडतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरूळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, तर कारंजा तालुक्यात ७२२.६ मि.मी. पाऊस पडतो. त्यात गतवर्षी १८ जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी १३२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यंदा याच तारखेपर्यंत त्यात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यात मासिक सरासरी १८७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण मासिक सरासरीच्या १८७.८ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या २४ टक्के आहे. अर्थात, जून महिन्याच्या पूर्वार्धातच मासिक सरासरीच्या जवळपास दुप्पट पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे भूजलपातळी सुधारण्यास मदत होणार आहे.
---------------------
मंगरूळपीर, मानोऱ्यात सरासरी दुपटीहून अधिक
वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मासिक सरासरीच्या तुलनेत खूप अधिक पाऊस पडला आहे. तथापि, मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यांत यंदा पावसाचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, मंगरूळपीर तालुक्यात १८ जूनपर्यंत ८३.१ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना, तर यंदा याच तारखेपर्यंत २२९.४ मि.मी., तर मानोरा तालुक्यात ८९.० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना २३५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
-----
जूनमधील पावसाचे तुलनात्मक प्रमाण (मि.मी.)
तालुका - २०२० चा पाऊस - २०२१ चा पाऊस
वाशिम - १२९.२, - १७१.९,
रिसोड - १५५.०, - १९८.२
मालेगाव - १७२.५, - १८७.०
मंगरूळपीर - १२९.०, - २२९.४
मानोरा - ९३.८, - २२९.४
कारंजा - १०३.४ - १२१.०
-------------------------------------
एकूण १३२.१ - १८७.४