जूनच्या पूर्वार्धातच मासिक सरासरीच्या १९१ टक्के पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:27 AM2021-06-20T04:27:21+5:302021-06-20T04:27:21+5:30
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ...
वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरुळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, तर कारंजा तालुक्यात ७२२.६ मिलीमीटर पाऊस पडतो. त्यात गतवर्षी १९ जून पर्यंत जिल्ह्यात सरासरी ११७.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा याच तारखेपर्यंत त्यात मोठी वाढ झाली असून, जिल्ह्यात मासिक सरासरी १९१.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण मासिक सरासरीच्या १८१.४ टक्के, तर वार्षिक सरासरीच्या २४.२ टक्के आहे. अर्थात जून महिन्याच्या पूर्वार्धातच मासिक सरासरीच्या जवळपास दुप्पट पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार आहे.
---------------------
मंगरुळपीर, मानोऱ्यात सरासरी दुपटीहून अधिक
वाशिम जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मासिक सरासरीच्या तुलनेत खूप अधिक पाऊस पडला आहे. तथापि, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण जिल्ह्यात सर्वाधिक असून, मंगरुळपीर तालुक्यात १८ जूनपर्यंत ८३.१ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना, तर यंदा याच तारखेपर्यंत २२९.४ मिलीमीटर तर मानोरा तालुक्यात ८९.० मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना २३५.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
-----
जूनमधील पावसाचे तुलनात्मक प्रमाण (मि.मी.)
तालुका - २०२०चा पाऊस २०२१चा पाऊस
वाशिम -१३३.४, -१७५.७,
रिसोड -१६०.१, -१९७.९
मालेगाव -१८८.६, -१९३.७
मंगरुळपीर -१३६.८, -२३४.०
मानोरा - ९६.५, -२३९.८
कारंजा -१०४.० -१२५.१
-------------------------------------
एकूण ११७.७ -१९१.१
----------------