पहिल्याच पावसाचे घरात शिरले पाणी
By admin | Published: June 12, 2017 07:40 PM2017-06-12T19:40:10+5:302017-06-12T19:40:10+5:30
वाशिम : वाशिम तालुक्यातील ग्राम पार्डी टकमोर येथे ११ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने अनेक नागरिकांचय घरात पाणी शिरले. यामुळे ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम तालुक्यातील ग्राम पार्डी टकमोर येथे ११ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने अनेक नागरिकांचय घरात पाणी शिरले. यामुळे ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली होती.
जिल्हयात मृगनक्षत्रापासून अनेक ठिकाणी सुरुवात झाली. जिल्हयात १ जूनपासून १२ जूनपर्यंत ३९३ मि.मि. पर्यंत सरासरी अपेक्षित होता प्रत्यक्षात ५६४ मि.मि. पाऊस पडला. १२ जून रोजी वशिम तालुक्यात ५० मि.मि. पाऊस बरसला. वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथे झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण नदी , नाले तुडूंब भरुन वाहले शिवाय गावात पाणी शिरुन नागरिकांच्या घरात शिरले. अनेक ग्रामस्थ घराच्या छतावर उभे राहतांना यावेळी दिसून आले. यावेही ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली असता अनेक ग्रामस्थांनी एकमेकांना मदतीचा हात पुढे केला. यापूर्वी एवढा पाऊस एकाच दिवशी कधी झाले नसल्याचे बोलल्या जात आहे.