शाळेची पहिली घंटा आज वाजणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:52 AM2020-11-23T11:52:47+5:302020-11-23T11:52:53+5:30

सोमवारपासून शाळेत चार तास शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत.

The first school bell will ring today | शाळेची पहिली घंटा आज वाजणार 

शाळेची पहिली घंटा आज वाजणार 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनामुळे तब्बल आठ महिन्यानंतर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. पालकांचे संमतीपत्र मिळालेल्या नववी ते बारावीतील जवळपास ४० हजार विद्यार्थ्यांना सोमवारपासून शाळेत चार तास शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे मिळणार आहेत.
यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. आॅक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा आलेख खाली आल्याने नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले. त्यानुसार मार्च महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सोमवार, २३ नोव्हेंबरपासून गजबजणार आहेत. जिल्ह्यात नववी ते बारावीत जवळपास ६६ हजार विद्यार्थी संख्या असून २५५१ शिक्षक संख्या आहे. याशिवाय १६६८ शिक्षकेतर कर्मचारी आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली असल्याने स्थानिक पातळीवरील परिस्थिती लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, शाळा प्रशासन व मुख्याध्यापक हे शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. ज्या शाळांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हॅण्डवॉश व अन्य अनुषांगिक दृष्टीने तयारी  पूर्ण झाली असेल, त्याच शाळा पहिल्या दिवशी उघडणार आहेत. तयारी पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत शाळा उघडणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. चार तासिकांसाठी वर्ग सुरू राहणार असून, प्राधान्यक्रमाने इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकविले जाइल.


इतिहास, भूगोल, संस्कृत, अर्थशास्त्र विषयाचे धडे दिले जाणार ऑनलाईन
इतिहास, भूगोल, संस्कृत तसेच अर्थशास्त्र विषयाचे धडे विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने दिले जाणार आहेत. शाळा सुरू झाल्यावर रोज तीन ते चार तास अध्ययन होणार असून, एक तासिका ४० मिनिटांची राहणार आहे. विशेष म्हणजे मुलांना जेवनाची सुटी राहणार नाही.


इंग्रजी, गणित, विज्ञान, भाषा विषयांसाठी जावे लागणार शाळेत
चार तासिका होणार असल्याने यामध्ये प्राधान्याने इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यानंतर उर्वरीत एका तासिकेमध्ये मराठी, हिंदी या विषयाचे धडे दिले जाणार आहे. संमतीपत्र असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यात येणार आहे.

Web Title: The first school bell will ring today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.