वृक्ष लावूनच विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल!
By Admin | Published: June 16, 2017 01:45 AM2017-06-16T01:45:46+5:302017-06-16T01:45:46+5:30
प्रशासनाचा निर्धार : २६ जूनला राबविला जाणार उपक्रम!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : केंद्र शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष लागवड योजनेला यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, जिल्हा पातळीवरही या उपक्रमाची जय्यत तयारी सुरू असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण झाल्यानंतरच विद्यार्जनाला प्रारंभ होईल, असा निर्धार करण्यात आला आहे.
गतवर्षी एकाच दिवशी १ जुलै २०१६ रोजी युद्ध स्तरावर वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला होता. त्यात प्रशासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांनी सहभाग नोंदवत एकट्या वाशिम जिल्ह्यात २.२२ लाख वृक्षांची प्रत्यक्षात लागवड करण्यात आली. यंदा हे प्रमाण वाढवून ५ लाख ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्याची सुरुवात २६ जूनपासूनच केली जाणार असून, शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिले पाऊलच मुळात वृक्षलागवड करून पडणार असल्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.
यानिमित्त प्रारंभी गावागावांतून वृक्षदिंडी काढून विद्यार्थ्यांना वृक्षलागवड व संगोपनाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.