आधी अंडरपास ब्रीज मग कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:09+5:302021-06-30T04:26:09+5:30
यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, माजी सरपंच डॉक्टर सुभाष मंत्री, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर बहादुरे, प्रदीप पाठक, ...
यावेळी सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, माजी सरपंच डॉक्टर सुभाष मंत्री, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर बहादुरे, प्रदीप पाठक, प्रदीप तायडे, गजानन शिंदे आदींच्या उपस्थितीमध्ये आ. अमित झनक यांनी अकोला वाशिम महामार्गावरील मेडशी बायपासवरून जाणाऱ्या वाकळवाडी रस्त्याचे प्रत्यक्ष पाहणी केली. वाकळवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी आहे, तसेच याच रस्त्यावर हेमाडपंती महादेवाचे मंदिरसुद्धा आहे. त्याचबरोबर मेडशी येथील शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी बायपासवरील रस्ता ओलांडून जाणे शक्य नाही. तसेच मेडशी वाकलवाडी हा रस्ता एमडीआरमध्ये आहे. भविष्यात येथे अंडरपास ब्रिज न दिल्यास उद्भवणाऱ्या समस्याकडे कार्यकारी अभियंता झालटे यांचे लक्ष वेधले तसेच अकोला वाशिम हायवेवरील रिसोड मतदारसंघात येणाऱ्या पांग्री नवघरे व तसेच काही ठिकाणीसुद्धा असाच प्रकार होऊ शकतो ही बाबसुद्धा त्यांच्या लक्षात आणून दिली. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी येत्या आठवड्यात सोबत पाहणी करण्याचे ठरविले असून जोपर्यंत या बायपासवरील अंडरपास पूल मंजूर होत नाही तोपर्यंत सदर रस्त्याचे काम बंद करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामपंचायत सुद्धा केली हाेती.