विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांना पाच ‘केआरए’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 04:05 PM2019-01-09T16:05:01+5:302019-01-09T16:05:33+5:30
वाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्यातील महानगर पालिकांसह नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रात विकासाचा आलेख उंचावण्यासाठी आयुक्त व मुख्याधिकाºयांना राज्याच्या नगर विकास विभागाने पाच प्रकारचे ‘केआरए’ (विशेष फलनिष्पत्ती क्षेत्र) दिले आहेत. स्वच्छता अभियानावर यात विशेष भर देण्यात आला आहे.
यासंदर्भात ८ जानेवारी रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे, की वाढते नागरीकरण ही संधी माणून केंद्र व राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची कालबद्ध व कालमर्यादेत अंमलबजावणी करण्यासाठी महानगर पालिकांचे आयुक्त व नगर परिषद, नगर पंचायतीच्या मुख्याधिकाºयांनी कार्य करायचे आहे. त्यानुसार, ३१ मार्च २०१९ पर्यंत नागरी स्वच्छतेत अग्रक्रम मिळविण्यासाठी संपूर्ण शहर हगणदरीमुक्त राखण्यात सातत्य राखणे, घनकचरा विलगीकरण मोहिम राबविणे, ओल्या कचºयाचे कंपोस्टींग करणे. यासह स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहरास मिळालेल्या गुणानुक्रमापेक्षा स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये अधिक प्रगत गुणानुक्रम मिळविणे, विविध प्रकारच्या करांची ९० टक्क्यांपेक्षा अधिक वसूली करणे, स्वउत्पन्नवाढीसाठी विशेष उपाययोजना करणे, पायाभूत सुविधांचे प्रकल्प प्राधान्यक्रमाने पुर्णत्वास नेणे, सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व अन्य प्रशासकीय बाबींची वेळेत पुर्तता करणे, असे पाच प्रकारचे केआरए शासनाने आयुक्त व मुख्याधिकाºयांना दिले आहेत. यामुळे महानगर पालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींच्या कामकाजात निश्चितपणे गती प्राप्त होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नगर विकास विभागाकडून देण्यात आलेल्या ‘केआरए’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. शहर विकासाच्या दृष्टीकोणातून हे ‘केआरए’ अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहेत.
- वसंत इंगोले
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाशिम