बचत गटाच्या प्रदर्शनातून पाच लाखाची उलाढाल

By admin | Published: March 27, 2017 03:27 PM2017-03-27T15:27:37+5:302017-03-27T15:27:37+5:30

जिल्हा क्रीडा संकुलावर महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते.

Five lakh turnover from the savings group show | बचत गटाच्या प्रदर्शनातून पाच लाखाची उलाढाल

बचत गटाच्या प्रदर्शनातून पाच लाखाची उलाढाल

Next

वाशिम: महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुलावर महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी सायंकाळ झाली असून, विविध वस्तूंच्या विक्रीतून पाच लाख रुपयांची उलाढाल झाली. 
समारोपीय कार्यक्रमाला प्रकल्प संचालक के. एम. अहमद, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंदरे, डीआरडीएचे मुकुंद नायक, स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजु सरतापे, बचत गटाच्या प्रवर्तक प्रिया पाठक, उप अभियंता सोमनाथ पवार, सहाय्यक  प्रकल्प अधिकारी राजेंद्र पडघान, गोपाल काकडे, जयश्री सारसकर, लेखाधिकारी शाम कडेकर, सचिन इंगोले यांची उपस्थिती होती. या प्रदर्शनात भाग घेतलेल्या ६०  बचत गटांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. तीन दिवसाच्या या प्रदर्शनात सुमारे ५ लाखाची विक्री झाली असल्याची माहिती राजेंद्र पडघान यांनी दिली.

Web Title: Five lakh turnover from the savings group show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.